सोमवार, २७ जुलै, २०२६

News Paper Agency Management

सबस्क्रिप्शन · डिलिव्हरी · बिलिंग · पेमेंट — एकाच व्यासपीठावर

आजची मुख्य बातमी

वही-पेन बंद.
एजन्सीचा प्रत्येक व्यवहार आता डिजिटल.

पहाटेचा रोस्टर, घरोघरी डिलिव्हरी, महिन्याचं बिल आणि पेमेंटची पावती — ८००+ ग्राहकांची एजन्सी चालवण्यासाठी लागणारं सगळं, मराठीत, एका क्लिकवर.

रोजचा डिलिव्हरी रोस्टर एका क्लिकवर तयारमहिन्याची बिले डिलिव्हरी नोंदींवरून आपोआपरोख · UPI · ऑनलाईन — सर्व पेमेंट पद्धतीथकबाकी अहवाल क्षणात — CSV एक्सपोर्टसहमराठी · हिंदी · English — तिन्ही भाषांत

आजच्या अंकात

८००+

ग्राहक व्यवस्थापन

रोज

डिलिव्हरी ट्रॅकिंग

१ क्लिक

मासिक बिले

१००%

व्यवहार नोंद

विभाग पहिला

एजन्सीसाठी सहा स्तंभ

०१

सबस्क्रिप्शन व्यवस्थापन

ग्राहक, वृत्तपत्रं, प्रती आणि दर — प्रत्येक सबस्क्रिप्शन सुरुवात-थांबा-विराम इतिहासासह नोंदवलं जातं.

०२

दैनंदिन डिलिव्हरी रोस्टर

सक्रिय सबस्क्रिप्शनवरून रोजचा रोस्टर आपोआप. डिलिव्हरी बॉय मार्क करतो, चुकलेली डिलिव्हरी लगेच दिसते.

०३

ग्राहक खतावणी

पत्ता, मार्ग, संपर्क, सबस्क्रिप्शन इतिहास आणि थकबाकी — प्रत्येक ग्राहकाची संपूर्ण कुंडली एका पानावर.

०४

स्वयंचलित बिलिंग

महिन्याची बिले डिलिव्हरी नोंदींवरूनच तयार होतात — जेवढं पोहोचवलं तेवढंच बिल. कॅरी-फॉरवर्डसह, प्रिंट-रेडी.

०५

पेमेंट व पावती

रोख, UPI, ऑनलाईन — पेमेंट जुन्या बिलांना आपोआप लागू होतं (FIFO). प्रत्येक पेमेंटची छापील पावती.

०६

अहवाल व एक्सपोर्ट

थकबाकी, वसुली, खपाचे अहवाल — फिल्टर लावा, CSV काढा, हिशेब मिनिटांत पूर्ण.

विभाग दुसरा

एजन्सीचा दिनक्रम, आता सोपा

पहाटेपासून महिन्याअखेरपर्यंत — प्रत्येक टप्पा व्यवस्थेत.

पहाटे ५:००

1

रोस्टर तयार

सक्रिय सबस्क्रिप्शनवरून आजचा डिलिव्हरी रोस्टर एका क्लिकवर — विराम व सुट्ट्या आपोआप वगळल्या जातात.

सकाळी ७:००

2

डिलिव्हरी मार्क

डिलिव्हरी बॉय प्रत्येक घराची नोंद करतो — वितरित, गैरहजर, नाही. दिवसाचा हिशेब लगेच.

महिन्याची १

3

बिले तयार

संपूर्ण महिन्याच्या नोंदींवरून सर्व ग्राहकांची बिले एकत्र — मागील बाकीसह, छपाईसाठी तयार.

केव्हाही

4

वसुली व पावती

पेमेंट नोंदवा — रोख, UPI, ऑनलाईन. रक्कम जुन्या बिलांना आपोआप लागू, पावती लगेच छापा.

विभाग तिसरा

पेमेंट जसं येईल, तसं नोंदवा

प्रत्येक पेमेंटची पावती, प्रत्येक रुपयाची नोंद — थकबाकी नेहमी अद्ययावत.

रोख

दारात वसुली, लगेच छापील पावती

UPI / QR

PhonePe, GPay — कुठलंही UPI ॲप

ऑनलाईन गेटवे

सुरक्षित ऑनलाईन पेमेंट — लवकरच

★ ★ ★

उद्याचा अंक डिजिटल पद्धतीने वाटा

आजच सुरुवात करा — सबस्क्रिप्शन ते पावती, सगळं एका व्यासपीठावर.

डॅशबोर्डवर जा